MR/Prabhupada 0363 - कोणी तुमचा मित्र असेल, आणि कोणी तुमचा शत्रू



Lecture on SB 7.9.17 -- Mayapur, February 24, 1976

यस्मात्प्रियाप्रियवियोगसंयोगजन्म
शोकाग्निना सकलयोनिषु दह्यमानः
दुःखौषधं तदपि दुःखमतद्धियाहं
भूमन्भ्रमामि वद मे तव दास्ययोगम्
(श्रीमद भागवतम् ७.९.१७) ।

प्रल्हाद महाराज, आधीच्या श्लोकात, ते सांगतात, मी खूप घाबरत आहे. या भौतिक अस्तित्वाची स्थिती, दुःखालयम अशाश्वतम (भ.गी. ८.१५) आता ते वेगवेगळ्या दुःखाचे टप्पे काय आहेत याचे वर्णन करीत आहेत. यस्मात, या भौतिक अस्तित्वामुळे. जेव्हा आपण या भौतिक जगात येतो तेव्हा बऱ्याच लोकांशी संबंध असतो. भूताप्त-पितृणाम, नृणाम. जसे आपण मातेच्या गर्भातून बाहेर येतो, तिथे अनेक नातेवाईक, मित्र असतात, भूताप्त, पितृ. भूताप्त, ऋषी, पितृणाम, नृणाम. आपण जोडले जातो. परंतु त्यापैकी काही प्रिय आहेत आणि काही मित्र नाहीत - शत्रू. तर यस्मात्प्रियाप्रिय-वियोग-संयोग-जन्म. वियोग-संयोग-जन्म.

जेव्हा एक मूले जन्माला येते तेव्हा ते पूर्वीच्या जीवनापासून विभक्त होते. आणि ते दुसऱ्या नवीन आयुष्याशी जोडले जाते, नवीन शरीर, वियोग-संयोग. कदाचित पूर्वीचे शरीर आनंददायक होते, आणि आताचे शरीर आनंददायक नाही, पतित. ते शक्य आहे. देहान्तार-प्राप्ती: (भ.गी. २.१३) । असे नाही की तुम्हाला नेहमी खूप सुखकारक शरीर मिळेल. पण माया शक्ती एवढी बलवान आहे, अगदी एखाद्याला डुकराचे शरीर मिळाले. तो विचार करतो, "हे खूप छान आहे." याला म्हणतात प्रक्षेपात्मिक-शक्ती.

मायेला विशेषतः दोन शक्ती प्राप्त झाल्या आहेत: आवरणात्मिक आणि प्रक्षेपात्मिक. साधारणता माया आपल्याला भ्रमात ठेवते, जर एखाद्याचे थोडे जरी अज्ञान दूर झाले. मायेच्या तावडीतून सुटण्याची इच्छा असेल, मायेची आणखी एक शक्ती आहे, ती आहे प्रक्षेपात्मिक. समजा एखाद्याने विचार केला, " आता, मी कृष्णभावनामृत बनेन. हि सर्वसाधारण भौतिक चेतना इतकी त्रासदायक आहे. मला कृष्णभावनामृत बनू दे." तर माया म्हणेल, "याचे तू काय करणार आहेत? चांगले आहे भौतिक चेतनेमध्ये रहा." याला प्रक्षेपात्मिक-शक्ती म्हणतात. म्हणून कधीकधी काही लोक आमच्या संस्थेत येतात; काही दिवस राहून, तो निघून जातो. हे प्रक्षेपत आहे, फेकला जाणे. जोपर्यंत तो गंभीर नसतो, तो आमच्याकडे राहू शकत नाही; त्याला काढून टाकले जाईल. तर प्रल्हाद महाराज सांगतात की या दोन स्थिती - एखाद्याला आनंद होत आहे, आणि एखाद्याला आनंद होत नाही - हे सतत सुरु आहे. असे नाही की " जर मी माझे हे शरीर बदलले, तर हि प्रक्रिया थांबेल." नाही. या भौतिक जगात जोपर्यंत तुम्हाला हे शरीर मिळाले आहे, तुमच्याकडे या दोन प्रक्रिया असतील. कोणीतरी तुमचा मित्र असेल आणि कोणीतरी तुमचा शत्रू. वियोग-संयोग-जन्म.

तर जेव्हा शत्रू असतात, तिथे विलाप, चिंता असते. शोकाग्नीना. असा विलाप विव्हळतेच्या अग्नीसारखा आहे. शोकाग्नीना. शोकाग्नीना सकल-योनिषु. जर तुम्ही विचार करता की फक्त मनुष्य समाजातच अश्या गोष्टी आहेत - कोणी शत्रू आहे, कोणी मित्र - नाही. कोणत्याही समाजात, कोणत्याही योनीत… तुम्ही पहिले असेल अगदी चिमण्या, पक्षी समाजात, ते भांडत असतात. तुम्ही ते पहिले असेल. ते खूप घनिष्टपणे मिसळत असतात, परत भांडतात, तर तुम्ही पक्षी घ्या किंवा कुत्रा घ्या. ते भांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर हे चालू आहे: कोणीतरी खूप प्रिय आहे, कोणी शत्रू आणि ते त्यांच्यामध्ये लढत आहेत. सकलयोनिषु दह्यमानः एका समाज टाळून दुसऱ्या समाजाकडे जाऊन तुम्ही निसटू शकत नाही. ते शक्य नाही. अशाप्रकारे मतभेद, शत्रुत्व आणि मैत्रीची ज्वाला भडकत राहते. ते चालू राहते. केवळ इथे नाही, अगदी स्वर्गीय ग्रहांवरपण. स्वर्गीय ग्रहांवर देवता आणि असुरांमध्ये लढाई होते. असुरांना देवांबद्दल असूया असते, आणि देवांना सुद्धा असुरांची असूया असते. सगळीकडे. अगदी राजा इंद्र, तो खूप श्रीमंत असूनही त्याला शत्रू आहेत. आपल्याला स्वर्गीय ग्रहावर जाऊन त्या वातावरणात श्रीमती उपभोगायची इच्छा आहे. पण तिथे सुद्धा तीच गोष्ट आहे.