MR/Prabhupada 0364 - भगवत धाम जाणे, हे इतके सोपे नाही



Lecture on SB 5.5.23 -- Vrndavana, November 10, 1976

जोपर्यंत आपण मूलभूत गुणांवर नियंत्रण ठेवत नाही, तमोगुण आणि रजोगुणावर, तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. ते शक्य नाही. ततो राजस-तमो-भावान. राजस तामो-भावान म्हणजे काम आणि लोभ. आतापर्यंत मला काम वासना आहे, आणि आतापर्यंत मला अधिकाधिक मिळवण्याचा लोभ आहे, जास्तीतजास्त इंद्रिय उपभोगण्याचा… तो लोभीपणा आहे. एखाद्याने कमीतकमी गोष्टीत समाधानी असावे.

आहार-निद्रा-भय-मैथुनं च सामान्यम एतात पशुभीर नराणाम आहार म्हणजे खाणे. आहार, निद्रा, झोपणे, आणि भय, आणि इंद्रियतृप्ती. ते आवश्यक आहे, परंतु वाढवण्यासाठी नाही तर कमी करण्यासाठी. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आजारी पडते त्याने त्याला आवडेल ते खायचे नाही. कारण तो आजारी आहे, डॉक्टर सांगतात की "तुम्ही थोडेसे जिवाचे पाणी किंवा ग्लुकोज प्या. तुम्हाला बरे व्हायची इच्छा असेल तर कोणताही ठोस आहार नाही." त्याचप्रमाणे, ह्या गोष्टी आवश्यक आहेत जोपर्यंत हे शरीर आहे. आहार-निद्रा-भय-मैथुन. पण त्या कमी करायच्या, वाढवायच्या नाहीत. हि मानवी सभ्यता आहे, वाढवायची नाही. वृंदावनातील गोस्वामींप्रमाणे ते इथे आहार-निद्रा-भय-मैथुन वाढवण्यासाठी आले नव्हते. नाही. ते कमी करण्यासाठी आले होते. निद्राआहार-विहारकादी-विजीतौ. ते गरजेचे आहे.

हे आहे वृंदावन-वासी, असे नाही की वृंदावनमध्ये राहायचे आहि आहार-निद्रा-भय-मैथुन वाढवायचे. ते वृंदावन-वास नाही. माकडेही वृंदावनात रहातात, आणि कुत्रे देखील, आणि डुकरे सुद्धा वृंदावनात राहतात. पण त्यांना माहित नाही कसे आहार-निद्रा-भय-मैथुन कमी करायचे. तुम्हाला माकडे दिसतील. ती सुद्धा वृंदावनमध्ये आहेत. पण तुम्हाला सापडेल एका नर माकडामागे तीन डझन मादी माकडे आहेत. तो वृंदावन-वास नाही. आहार-निद्रा. त्याचा अर्थ ब्राह्मणी संस्कृतीची गरज आहे दमो, शमो. ती आवश्यक आहे. ती ब्राम्हणी संस्कृती आहे. दुर्दैवाने वर्तमान संस्कृती, ती कमी होण्यासाठी नाही. ती फक्त वाढवत आहे. पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे इंद्रियतृप्ती वाढवण्याची साधने आहेत, "मशीन, मशीन, मशीन, मशीन." तर, आणि ब्राह्मणी संस्कृती म्हणजे शमो दमो तितिक्ष. तितिक्ष म्हणजे काही गोष्टींशिवाय मी दुःख भोगू शकतो. दुःख. एखाद्याने दुःख भोगण्याचा अभ्यास केला पाहिजे. दुःख, ती तपस्या आहे. तपसा ब्रह्मचर्येन (श्रीमद भागवतम् ६.१.१३) । तपस्या ब्रम्हचर्यापासून तपस्या सुरु होते. आम्ही लैगिक जीवन किंवा इंद्रियतृप्तीचा सराव करतो. तपस्या म्हणजे सर्व प्रथम हे थाबवा. तपसा ब्रम्हचर्येन (श्रीमद भागवतम् ६.१.१३) हा सराव आहे.

तर परम धाम परत, घरी परत जाण्यासाठी योग्य बनणे. ते इतके सोपे नाही. ते इतके सहज नाही… आपले भौतिक जीवन जवळजवळ शून्य केले पाहिजे. जवळजवळ शून्य नाही… प्रत्यक्षात शून्य. अन्याभिलाषिता-शून्यम (भक्तिरसामृत सिंधू. १.१.११). सराव आवश्यक आहे, म्हणून हे आमचे कृष्णभवनामृत केंद्र, शमो, दमो तितिक्षचा अभ्यास करण्यासाठी आहे. म्हणूनच आम्हाला हे बघायचे आहे की शमो, दमो, तितिक्षचा अभ्यास करण्यासाठी तो किती योग्य आहे. तर कोणी नवीन मुलगा आला आणि जसे त्याला काही काम दिले जाते, जे इंद्रियतृप्तीसाठी फारसे चांगले नाही, ते निघून जातात. त्याचा अर्थ ते तयार नाहीत. चांगले आहे की ते निघून जातात. बंगालीत असे म्हटले जाते , दुष्ट गोरुते शून्य गोयालोआ: "जर गायी त्रासदायक असल्यास, गायीशिवाय गोठा रिकामा ठेवा, परवानगी देऊ नका."

तर हे कृष्णभावनामृत अंदोलन उन्नतीसाठी आहे. पशु वर्गातील लोकांना ब्राम्हणाच्या स्तरावर आणण्यासाठी. म्हणून यज्ञपवीत धागा दुसऱ्या दिक्षेच्या रूपात दिला जातो. की "त्याने आता शमो दमो तितिक्ष आर्जवचा अभ्यास केला आहे. आणि त्याने कृष्ण काय आहे, तो काय आहे, हे त्याने शिकले आहे त्याचे श्रीकृष्णांबरोबर काय नाते आहे, कसे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करावे." ह्या ब्राम्हणी योग्यता आहेत. जर एखादा या स्तरापर्यंत उन्नत झाला… या स्तराला सत्वगुण म्हणतात.