MR/Prabhupada 0370 - माझ्या विचारात मी कोणतेही श्रेय घेत नाही



Conversation with Prof. Kotovsky -- June 22, 1971, Moscow

कोणताही कट्टर हिंदू येऊ शकतो, पण आमच्या कड़े शस्त्रे आहेत, वेदिक पुरावे. कोणीही आले नाही. पण अगदी ख्रिश्चन पादरी... अमेरिकेतील पादरी देखील, ते माझ्यावर प्रेम करतात. ते म्हणतात की "ही मुले, आमची मुले, ते अमेरिकन आहेत, ते ख्रिश्चन आहेत, ते ज्यू आहेत. आणि ही मुले इतकी देवाच्या मागे आहेत, आणि आम्ही त्यांना मुक्त करू शकलो नाही?" ते कबूल करतात, त्यांचे वडील, पालक, माझ्याकडे येतात. ते सुद्धा मला पूर्ण अभिवादन करतात आणि म्हणतात, "स्वामिजी, हे आमचे मोठे नशीब आहे की तुम्ही इथे आलात. तुम्ही देवाबद्दलची भावना शिकवतात." तर उलटपक्षी, मला इतर देशांतून आदरातिथ्य मिळाले. आणि भारत सुद्धा, जसे तुम्ही भारता बद्दल विचारले, बाकी सगळे संप्रदाय, ते कबूल करतात की, माझ्या आधी, अनेक शेकडो स्वामी तिथे गेले, पण ते एकाही व्यक्तीस कृष्ण भावने मध्ये रुपांतरित करू शकले नाही. ते त्यासाठी प्रशंसा करतात. आणि जो पर्यंत माझा संबंध आहे, मी कुठलेही श्रेय घेत नाही, पण मला विश्वास आहे की मी कुठलाही बदल न करता वैदिक ज्ञान सादर करत आहे, कोणतीही भेसळ न करता, ते प्रभावी झाले आहे. ते माझे योगदान आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला जर योग्य औषध मिळाले आणि तुम्ही रोग्याला नियंत्रित केले, तुम्हाला खात्री वाटते की तो बरा होईल.