MR/Prabhupada 0371 - आमार जीवनाचे तात्पर्य



Purport to Amara Jivana in Los Angeles

आमार जीवन सदा पापे रत नाहिको पुण्येर लेश. हे गाणे भक्तिविनोद ठाकुरांनी वैष्णव नम्रतेने गायले आहे. वैष्णव शांत आणि नम्र असतो. तर ते सर्वसाधारण लोकांचे वर्णन करत आहेत, स्वतःला त्यांच्यातील एक मानून. सर्वसाधारण लोक इथे दिलेल्या वर्णनाप्रमाणे आहेत. ते म्हणतात की "माझे आयुष्य सतत पाप कर्म करण्यात गुंतलेले आहे. आणि जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला धार्मिक क्रियाकलापांचे नमो निशाणही मिळणार नाही. फक्त पाप कर्म भरलेली आहेत. आणि मी कायम इतर जीवांना त्रास देण्यास इच्छुक आहे. तेच माझे काम आहे. मी इतरांना त्रास झालेला पाहू इच्छितो आणि त्यात मला आनंद वाटतो."

निज सुख लागी पापे नाही दोरी. "माझ्या इंद्रियतृप्तीसाठी, मी कोणत्याही पाप कर्माची पर्वा करत नाही. त्याचा अर्थ मी कोणतेही पाप कर्म करायला तयार असतो जर ते माझ्या इंद्रियतृप्तीसाठी असेल." दया-हीन स्वार्थ-परो. "मी जराही दयाळू नाही, आणि मी फक्त माझा स्वार्थ पहातो." पर-सुखे दुःखी. "जेव्हा इतरांना त्रास होतो मला खूप आनंद होतो. आणि नेहमी खोटे बोलतो," सदा मिथ्या-भाषि "अगदी साध्या गाष्टींसाठी मला खोटे बोलायची सवय आहे." पर-दुःख सुखी-करो. "आणि जर एखादा दुःखी आहे, तर ते माझ्यासाठी खूप आनंददायी आहे."

अशेष कामना हृदि माझे मोर. "माझ्या हृदयात खूप इच्छा आहेत, आणि मी नेहमी क्रोधीत आणि खोटी प्रतिष्ठेत आहे, सतत खोट्या गर्वाने फुगलेला." मदमत्त सदा विषये मोहित. "मी इंद्रियतृप्तीच्या विषयांकडे आकर्षिले गेलो आहे, आणि जवळजवळ मी वेडा झालो आहे." हिंसा-गर्व विभूषण. "माझे दागिने ईर्षा आणि खोटा अभिमान आहे." निद्रलास्य हत सुकार्जे बिरत. "मला जिकंले आहे, किंवा झोप आणि आळसाने माझ्यावर विजय मिळवला आहे." सुकार्जे बिरत, "आणि मी नेहमी धार्मिक कृत्यांच्या विरोधात असतो." अकार्जे उद्योगी आमी, "आणि पाप कर्म करण्याला मी उत्साही असतो." प्रतिष्ठा लागिया शाठ्य-आचरण, "मी माझ्या प्रतिष्ठेसाठी इतरांना फसवतो."

लोभ-हत सदा कामी, "माझ्यावर लोभाने आणि कामाने विजय मिळवला आहे." ए हेनो दुर्जन सज्जन बर्जित, "तर मी मी इतका पतित आहे, आणि मला भक्तांचा संग नाही." अपराधी, "गुन्हेगार," निरंतर, "सतत." शुभ-कार्ज-शून्य, "माझ्या आयुष्यात, काही शुभ कृत्ये नाहीतच." सदानर्थ मनः, "आणि माझे मन नेहमी कोणत्यातरी वाईट गोष्टीकडे आकर्षित होते." नाना दुःखे जर जर. "म्हणून आयुष्याच्या अखेरीस, या सर्व कष्टांमुळे मी जवळजवळ अपंग आहे." वार्धक्ये एखोन उपाय-विहीन, " माझ्या वृद्धावस्थेत माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही," ता अते दीन अकिंचन, म्हणून जबरदस्तीने, मी आता खूप शांत आणि नम्र झालो आहे." भक्तिविनोद प्रभुर चरणे, "अशाप्रकारे भक्तिविनोद ठाकूर अर्पण करीत आहेत. त्यांच्या जीवनातील कार्याबद्दल लिहिलेल्या पंक्ती परम प्रभूच्या पदकमलांशी"