MR/Prabhupada 0372 - अनादि कर्म फलेचे तात्पर्य



Anadi Karama Phale and Purport - Los Angeles

अनादि कर्म-फले. अनादि फले पोरीय भवार्णव-जले तरिबारे ना देखि उपाय. हे भक्तीविनोद ठाकूर यांनी गायलेले गाणे आहे. बद्ध आत्म्याचे चित्र रेखाटले आहे. इथे असे सांगितले आहे, भक्तिविनोद ठाकूर बोलत आहेत, स्वतःला एक सामान्य मनुष्य मानत आहेत, की माझ्या भूतकाळातील कर्मामुळे, मी आता या अज्ञानाच्या महासागरात पडलो आहे, आणि मला या महासागरातून बाहेर येण्याचे कोणतेही साधन सापडत नाही. हे विष महासागरासारखे आहे, ए विषय-हलाहले, दिवा-निशि हिया ज्वले. जसे कोणी तिखट जेवण जेवते, तर हृदयात जळजळते. त्याचप्रमाणे, आम्ही इंद्रियतृप्ती करून सुखी होण्याचा प्रयत्न करीत आहोत. खरं तर, हे अगदी उलटे होते, आपले हृदय जळजळण्याचे कारण.

ए विषय-हलाहले, दिवा-निशि हिया ज्वले. ती जळजळ चोवीस तास, दिवस आणि रात्र चालू आहे. मन कभु सुख नाही पाय, आणि माझे मन या कारणामुळे समाधानी नाही. आशा-पाश-शत-शत क्लेश देय अबिरत, मी शेकडो आणि हजारो योजना आखत आहे, कसे मी सुखी होईन. पण प्रत्यक्षात ते सर्व मला चोवीस तास त्रास,वेदना देत आहेत. प्रवृत्ती-उर्मिर ताहे खेला, ते समुद्राच्या लाटांसारखे आहे, नेहमी एकदुसऱ्यावर आपटतात, हि माझी स्थिती आहे. काम-क्रोध-आदी चय, बाटपारे देय भय, त्याशिवाय अनेक चोर आणि डाकू आहेत. विशेषतः ते सहा आहेत, वासना, क्रोध, ईर्षा, भ्रम, आणि अनेक प्रकारे, ते नेहमी उपस्थित असतात, आणि मी त्यांना घाबरतो. अबसान होइलो आसि बेला, अशाप्रकारे, माझे आयुष्य प्रगती करीत आहे, किंवा माझा अंत जवळ येत आहे. ज्ञान-कर्म ठग दुई, मोरे प्रतारिया लोई, जरी माझे हे स्थान आहे, तरीही, दोन प्रकारचे कर्म, मानसिक अनुमान आणि कर्मफल, ते मला फसवत आहेत.

ज्ञान-कर्म ठग, ठग म्हणजे फसवणारा. तेथे आहेत ज्ञान-कर्म ठग दुई, मोरे प्रतारिया लोई. ते माझी दिशाभूल करीत आहेत, आणि अबशेषे फेले सिंधू-जले, माझी दिशाभूल केल्यानंतर, ते मला किनाऱ्यावर आणतात, आणि मला समुद्रात ढकलतात. ए हेनो समये बंधू, तुमि कृष्ण कृपा-सिंधू, अशा परिस्थितीत, माझ्या प्रिय कृष्णा, तूच माझा एकमेव मित्र आहेस, तुमि कृष्ण कृपा-सिंधू. कृपा कोरी तोलो मोरे बले, आता माझ्याकडे या अज्ञानरूपी सागरातून बाहेर पडायला ताकद नाही. म्हणून मी विनंती करतो, मी तुमच्या पदकमलांशी प्रार्थना करतो, की तुमच्या शक्तीने, तुम्ही मला उचलून घ्या.

पतित-किंकर धरी पाद-पद्म-धुली कोरी, शेवटी मी तुमचा चिरंतन सेवक आहे. तर, कसा किंवा इतर कारणाने, मी या सागरात पडलो आहे, तुम्ही मला उचलून घ्या, आणि तुमच्या पदकमलाच्या धुळीच्या रूपात माझा स्वीकार करा. देहो भक्तिविनोद आश्रय, भक्तिविनोद ठाकूर विनंती करतात, की "कृपया मला तुमच्या पदकमलांशी आश्रय द्या." आमि तव नित्य-दास, प्रत्यक्षात मी तुमचा चिरंतन सेवक आहे. भुलीया मायार पाश, काही कारणाने मी तुम्हाला विसरलो, आणि मी आता मायेच्या पाशात फसलो आहे. बद्ध होंये आचि दोयामोय, माझ्या प्रिय देवा, मी अशाप्रकारे गोंधळलो आहे. कृपया मला वाचवा.